शब्दाची शब्दाला, मनाची मनाला

Header Ads

Tuesday, July 7, 2020

गुरु पौर्णिमा (guru purnima) व गुरु शिष्य संबंध (guru shishya sambandh)

गुरु पौर्णिमा (guru purnima) व गुरु शिष्य संबंध (guru shishya sambandh)

गुरु पौर्णिमा (guru purnima) ही एक अशी परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरुंना समर्पित आहे. गुरु शिष्य संबंध (guru shishya sambandh) उजागर करणारा हा दिवस.

guru-pornima-guru-shishya-sambandh
guru-pornima-guru-shishya-sambandh

गुरु पौर्णिमा माहिती (guru purnima Mahiti)

गुरु पौर्णिमा (guru purnima) पारंपारिकपणे आपल्या गुरुजनांचा आदर करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाळला जातो. हिंदू दिनदर्शिकेत आषाढ महिन्यात (जून-जुलै) पौर्णिमेच्या दिवशी गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. याला व्यास पौर्णिमा म्हणून वेद व्यासाचा वाढदिवस म्हणूनही ओळखले जाते. महात्मा गांधींनी त्यांचे आध्यात्मिक गुरू श्रीमद राजचंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महोत्सवाचे पुनरुज्जीवन केले.

संस्कृत मूळ गु म्हणजे अंधकार किंवा अज्ञान, आणि रु अंधकार दूर करण्याचा अर्थ दर्शविते. म्हणूनच, एक गुरु आहे जो आपल्या अज्ञानाचा अंधकार दूर करतो.
या महोत्सवाला धार्मिक महत्त्व व्यतिरिक्त भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासकांसाठीही मोठे महत्त्व आहे. भारतीय शिक्षणशास्त्रज्ञ त्यांच्या शिक्षकांचे आभार मानून तसेच मागील शिक्षक आणि अभ्यासकांची आठवण करून हा दिवस साजरा करतात.

मानवी जीवन आणि गुरू ह्या दोन गोष्टी वेगळ्या असूच शकत नाही; असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. कारण मुल जन्मल्याबरोबरच आईरुपी गुरूचा त्याच्या जीवनात प्रवेश होतो; म्हणून आईला पहिला गुरू म्हटले जाते.
निसर्गातल्या प्रत्येक घटकाकडून ,घटनेतून आपण काही ना काही शिकत असतो . ती प्रत्येक वस्तू, घटना आपल्यासाठी गुरूच असते.
गुरु पौर्णिमा (guru purnima) व गुरु शिष्य संबंध (guru shishya sambandh)
गुरु पौर्णिमा (guru purnima) व गुरु शिष्य संबंध (guru shishya sambandh)

गुरु विषयी माहिती (Guru Vishe Mahiti)

वास्तविक जीवनातील गुरू जीवनाचे मार्गदर्शक असतात. ज्यांच्यामुळे जीवनातील काटेकुटे (समस्या ), अडीअडचणी, भलबूर, योग्य / अयोग्य या बद्दल सारासार विचार करून आपण चांगल्या प्रतीचे जीवन जगू शकतो.
शालेय जीवनात आपले शिक्षक; आपले गुरू असतात. विविध प्रकारचे विषयज्ञान देऊन शिक्षक आपणास बौध्दिक क्षेत्रांत परिपूर्ण होण्यास मदत करतात; तसेच विविध प्रसंगातून, संस्कारातून वर्तन परिवर्तन घडवून आणतात.
या सर्व संस्कारातून आपण सुज्ञ बनत जातो. शालेय गुरूंमूळे आपले एक आदर्श व्यक्तिमत्व घडत जाते. योग्य रीतीने जीवन चरितार्थ चालवण्यासाठी आपण सक्षम होतो. शालेय गुरू त्यांचे संस्कार लाभले नाही तर आपले जीवन दावं नसलेल्या वासरासारखे भरकटते. योग्यवेळी जीवनाचा योग्य मार्ग सापडेलच असे नाही.

मानवी जीवनात तिन गुरू असतात.

पहिले गुरू पालक

पहिले गुरू आपल्यावर जीवनात निरनिराळे संस्कार करून आपले जीवन घडवणारे आईवडील. समाजाला मिसळण्यास मदत करणारे आपले पालक आपले पहिले गुरु आहेत!
आमचे पालक आम्हाला आमच्या बालपणात सर्वकाही शिकवतात. काय ते योग्य आणि काय अयोग्य आहे हे ते आपल्याला जागरूक करतात. आपल्यात चांगल्या सवयी लावतात .
बालपणात आईवडील चांगल्या सवयी लावतात; योग्य अयोग्यतेची जाणीव करून देतात. मोठ्यांना पाहुण्यांना नमस्कार करायला लाऊन नम्रतेची वृत्ती आणि भारतीय संस्कृतीची जाणीव करून देतात, शुभंकरोती आणि देवाजवळ दीप लावण्यातून अध्यात्मिकता जोपासण्याचे शिक्षण मिळते. म्हणून आईवडिलरूपी प्रथम गुरूला प्रथम वंदन.

गुरु पौर्णिमा (guru purnima) व गुरु शिष्य संबंध (guru shishya sambandh)
गुरु शिष्य संबंध (guru shishya sambandh)

द्वितीय गुरू शिक्षक

द्वितीय गुरूस्थानी शालेय शिक्षक येतात. जे आपल्या जीवनाची विविध अंग समृध्द करतात. भाषा समृध्दी, राष्ट्रप्रेम, त्याग, ऐतिहासिक आदर्श आपल्यासमोर ठेवतात तसेच सामाजिक ॠणांचे भान ठेवायला शिकवतात.
आमचे शिक्षक आम्हाला विविध विषयांचे ज्ञान देतात. ते आम्हाला शिकवतात की "त्याग हा आपल्या जीवनाचा आधार असतो." केवळत्यागाचे गुण असणारी मुलेच राष्ट्राचे रक्षण करू शकतात. आमचे शिक्षक निस्वार्थ भावनेने आम्हाला विविध विषय शिकवून प्रगतीच्या मार्गावर घेऊन जातात!
आमचे शिक्षक आम्हाला विविध भारतीय भाषा शिकवतात आणि अशा प्रकारे आपल्या मातृभाषेचा अभिमान जागृत करतात. रामायण, महाभारत, दासबोध इत्यादी पवित्र ग्रंथांच्या अभ्यासालादेखील ते आवडतात. या माध्यमातून ते आपल्या संतांचा परिचय करून देतात आणि त्यांच्याप्रमाणेच आपल्याला आकार देण्याचा प्रयत्न करतात.
याशिवाय ते आम्हाला सामाजिक विज्ञान आणि अर्थशास्त्र यासारखे विषयही शिकवतात आणि आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपण ऋणी आहोत याची जाणीव करून देते. अर्थशास्त्राद्वारे ते आपल्याला भ्रष्ट मार्गाने नव्हे तर वाजवी मार्गाने पैसे मिळवण्यास शिकवतात.
गुरुपौर्णिमा हा अशा महान शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे: तर माझ्या मित्रांनो, तुम्हाला हे समजले असेलच की शिक्षक आपल्याला जीवनात बरीच मूल्ये शिकवतात आणि त्यांना व्यवहारात आणण्यासाठी आवश्यकतेनुसार शिक्षा देतात. आम्ही नेतृत्व केले पाहिजे हा त्यामागील आदर्श जीवनाचा खरा हेतू आहे.

अध्यात्मिक गुरु

अध्यात्मिक गुरू आपल्या जीवनाचा खरा अर्थ आपल्यास प्रकट करतात: आतापर्यंत या लेखात आपण या भौतिक जगात मार्गदर्शन करणार्या गुरूंबद्दल पाहिले आहे. आता आपण आपला तिसरा गुरु अध्यात्मिक गुरु याबद्दल पाहू.
अध्यात्मिक गुरू आपल्याला आपल्या -या जीवनाची ओळख करून देतात. अध्यात्मिक गुरूमुळे आपण प्रार्थनेच्या रुपाने कृतज्ञता व्यक्त करायला शिकतो, तसेच नामस्मरणाचा मार्ग लाभतो.
अध्यात्मिक गुरू आपल्याला आपली खरी ओळख प्रकट करतात. अज्ञानामुळे, आपण फक्त भौतिक शरीर आहोत अशी खोटी धारणा आपल्या मनात येते.
त्यानंतर संसार सागरातून तरून जाण सोपं करण्यासाठी मदत करणारे जीवनाला परिसस्पर्श करणारे अध्यात्मिक गुरू! अशा अध्यात्मिक गुरू शिष्यांच्या काही जोड्या आपल्याला माहिती आहेत.

 गुरु शिष्य जोडी नाव (guru shishya jodi name)



श्री कृष्ण-अर्जुन, श्री रामकृष्ण परमहंस - स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास स्वामी - शिवाजी महाराज गुरु-शिष्य संत निवृत्तीनाथ -संत ज्ञानेश्वर, सांदिपनी- श्रीकृष्ण. द्रोणाचार्य- एकलव्य हे अध्यात्मिक गुरूशिष्य परंपरेची आपल्याला ओळख करून देतात.

खरे शिक्षक, खरा पंडित किवा खरे गुरू कसे असावेत असा विचार केला तर एक विचार पुढे येतो. तो म्हणजे खरे शिक्षक, पंडित, गुरू आपल्या ज्ञानाचे क्षेत्र मग विज्ञान, भाषा, समाजशास्र वा अध्यात्म असो त्या त्या क्षेत्रातील ज्ञानाचं संचित समृध्द करून आपले विद्यार्थी / शिष्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तळमळणारे धडपडणारे असावेत. त्यांच गुरू असणं हे त्यांच्यासाठी एक व्रत असायला हवे.
आदर्श शिक्षक / गुरू तोच जो आपल्या मुलांचं आयुष्य घडवतो.


स्वप्न पूर्ण करायला ,दृष्टीला तेज देतो 
आकाशात भरारी घ्यायला ,पंखांना बळ देतो 
सूर्याने साथ सोडली तरी ,चंद्र बनून प्रकाश देतो 
आशीर्वाद आणि शुभचिंतक बनून ,नेहेमी पाठीशी उभा रहातो.
तो आणि तोच खरा गुरू!!

गुरु शिष्य उदाहरणे (Guru shishya stories)

गुरु पौर्णिमा (guru purnima) व गुरु शिष्य संबंध (guru shishya sambandh)
गुरु पौर्णिमा (guru purnima) 
सं ज्ञानेश्वर महाराज अत्यंत विनयशीलपणे आपले कर्तृत्व आपले गुरू निवृत्तीनाथांच्या चरणी अर्पण करतात, गुरूचरणी प्रार्थना करताना म्हणतात,

'इथे -हाटीचेये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी ।।
तसेच संत ज्ञानेश्वर गुरूबद्दल बोलताना म्हणतात, 'ज्यांच्या कृपेने माझे श्वासही काव्यग्रंथ होतील, अशी गुरूकृपा मला लाभली आहे. मग मी गीतेवर मराठी टीका करतो यात काय नवल? माझे गुरू माझ्याकडून सर्व करवून घेण्यास समर्थ आहेत.


गीतेवरीलटीकेबद्दल लिहीताना संत ज्ञानेश्वर म्हणतात,
"श्रीगुरूकृपा काय नोहेज्ञानदेवो म्हणे ।।या कारणे मिया ।श्री गीतार्थ -हाटीया ।।केला लोकांच्या दीठीचा विषो ।।परी -हाटे बोल रंगे कवळिता पै गीतांगे .........तो लाभाचा प्रबंध ओवी केला मिया
एकंदरीत काय तर, तत्कालीन संस्कृत जाणणा-या लोकांसाठी मी गुरूकृपेने मराठीत गीतार्थ लिहिला म्हणून त्यासाठी कोणीही वंचित रहाणार नाही .
यापुढे गुरूचे महत्व वेगळ्या दृष्टीने सांगितले आहे. आपली विविध शक्तिस्थाने (विविध ज्ञानचक्र )केवळ भक्ती अथवा तपाचरणाने जागृत होत नाहीत, त्यासाठी गुरूचे मार्गदर्शनच असावे लागते, गुरूपासून शक्तीचा लाभ झाला तर क्षुरसा धारे सारख्या कठीण मार्गावर गुरूचे मार्गदर्शन असेल तर भरभर मार्गक्रमण होते.
प्रवृत्तिनीवृत्तीकृतकार्या।अवश्य पाहिजे आचार्या आपमति भजता राया अनेक अपायामाजी पडे

काही वेळेस समाजात या विरूध्द दृश्य पहावयास मिळते. याला संतकालही अपवाद नाही, तत्कालीन संत ,संत तुकाराम महाराजांनी गुरूमार्गावर ताशेरे ओढलेले दिसून येतात. पण ते गुरूवर नसून ढोंगीपणावर/ बुवाबाजीवर आहेत हे ही लक्षात येते. कारण साधाभोळा भारतीय समाज ढोंगी बुवांच्या मधाळ बोलण्यावर विश्वास ठेऊन अंधश्रद्धेच्या गर्तेत बुडून रसातळाला गेलेला दिसतो, कर्मकांडात गुरफटतो. तुकारामबुवांचा -या ज्ञानी गुरूंवर रोष नव्हता म्हणून गुरूंबद्दल बोलताना ते म्हणतात,

'सदगुरूराये कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही
अशा या गुरूचे अस्तित्व आणि महत्व दिगंतापर्यंत अबाधित राहिल .
म्हणून शेवटी ,
"गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णो गुरूर्देवो महेश्वरा।गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:"
गुरूचरणी सादर प्रणाम !!!-
कोणताही धर्म असो, भारतीय विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांचे आभार मानून गुरु पौर्णिमा (guru purnima) साजरी करतात. गुरु-शिष्या संबंधांमध्ये (Guru shishya sambandh) मुख्य परंपरा म्हणजे आशीर्वाद, म्हणजेच विद्यार्थी त्याच्या  गुरुला अभिवादन आणि गुरु एखाद्या व्यक्तीच्या यश आणि आनंदासाठी आशीर्वाद देते.

Popular Feed

Recent Story

Featured News

Back To Top