शब्दाची शब्दाला, मनाची मनाला

Header Ads

Tuesday, June 9, 2020

संकल्प(sankalp), युवक / विद्यार्थी व वृध्दांसाठी

संकल्प(sankalp), युवक / विद्यार्थी व वृध्दांसाठी
संकल्प(sankalp), युवक / विद्यार्थी व वृध्दांसाठी

संकल्प(sankalp), युवक / विद्यार्थी व वृध्दांसाठी

" घडणार होत ,घडुनिया गेल,
भुमिनेच दिलासृजनाचा वसा,
कोंब होऊनीउगवत तरूणा,
नको भाकूस कुणाची करूणा”
फ्रेश आणि क्षितीजाची स्वप्न पहायला हवीत हे खर, पण ती स्वप्न कुठे दुकानात किंवा बिगबाजारात मिळत नाही; त्यासाठी स्वत:ला बदलायचं असत.
मार्गातले खाचखळगे, ठेच लागणारे दगड बाजूला सारायचे असतात. त्यासाठी सतर्कता असायला लागते आणि हे सार तेव्हाच होऊ शकत जेव्हा आपण धेय्यबिंदू ठरवू. ठरवलेल्या धेय्यबिंदूला गाठण्यासाठी संकल्प करायला लागतात.
युवक स्वत:बरोबरच देशाचा विचार करून संकल्प मनी धरू शकतात .संकल्प मोठे असावेत पण कुशीतले असावेत; क्षमते बाहेरचे असले म्हणजे युवक ते पूर्ण करण्यासाठी समर्थ ठरतीलच असे नाही आणि समर्थ नसले तर 'वाम' वाटांना लागण्याची शक्यता अधिक असते.
म्हणून संकल्प पूर्ण करता येतील असे म्हणजे कुशीतले असावेत.अनेक छोट्या संकल्पांच्या पूर्तीनंतर जीवन स्वयंप्रकाशीत बनू शकते. युवा पिढीला माझ सांगणं आहे.
माळ्याशिवाय बागेला बहर नाही ,
मेहनत करणारा कधी अपयशी होत नाही .,

संकल्प(sankalp) युवकासाठी -

 "तू स्वत:चे आकाश स्थापित कराव, स्वत:च्या पावलागणिक आत्मविश्वास निर्माण करावा आणि त्यातूनच स्वत:चे संकल्प साध्य करावेस."

चंद्रावर , मंगळावर घर बांधायचा संकल्प नाही केला तरी चालेल पण माझ्या देशबंधूंना अन्न, वस्र, निवारा आणि शिक्षण देण्याचा संकल्प करू शकता व त्यानुसार वाटचाल करू शकता .

युवकांनी संकल्प करावेत मग विद्यार्थ्यांनी काय फक्त पुस्तक एके पुस्तक करायचे? तर नाही, किशोरावस्थेत अवधान स्थिर नसत आजूबाजूला भुलवणारे, विचलित करणारे असंख्य चेकत असतात पण त्यांना न भुलता आपल्या देशात, विश्वात काय चाललंय ? कसले शोध लागताहेत ? कोणते पुरस्कार कोणाला मिळाले ? पर्यावरणाची मागणी काय आहे?  या बाबत सतर्क रहायला हव ! आपण देशाचं स्वप्न आहोत,

संकल्प(sankalp) विद्यार्थीसाठी -

        ज्यांच्या मजबुतीवर देश उभा रहाणार आहे ती पावलं आपण आहोत, आपण ज्ञानाने, तनाने आणि मनानं देखिल भक्कम असायला हव. हीच कमाई विद्यार्थीदशेत आपण करू शकतो हाच विद्यार्थ्यांचा संकल्प असू शकतो.
        तुम्ही म्हणाल यात नविन वर्षाचा संकल्प कुठे आहे? पण मित्रांनो बोललेलं एक वाक्य म्हणजे संकल्प नसतो. कुठल्याही वक्तव्याला पूर्ण करण्यासाठी ठामपणे उभ रहाणं म्हणजे संकल्प ना !

संकल्प(sankalp) वृध्दांसाठी -

 साठी ओलांडलेले म्हणजे वृध्द काय संकल्प करू शकतात ?-

वयाची साठी ओलांडल्यावर आपण समजतो झाल, खूप केल, आता आराम करायचा, टेन्शन फ्री जगायचं! पण छोट्या छोट्या गोष्टींव्दारे नातवंडांशी खेळता खेळता काही संस्कार आपण करूच शकतो ना! 
आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी लहान मुलांच्या मनावर कोरल्या जातात. त्यावर त्यांचा विश्वास बसतो; सगळ खर वाटत त्यांना! म्हणून ते संस्कार रूजवण्याची गरज आहे. आज समाज ज्या विकृतावस्थेकडे वाटचाल करतोय त्यापासून आपण समाजाला वाचवू शकतो; तसला संकल्प करू शकतो.
तासोंतास 8/10 वृध्द मिळून टिका टिपणी करण्यापेक्षा परिसरातील गार्डन, एखाद्या मंदिराचे आवर किंवा जागिंग पार्क या सारख्या ठिकाणी मुलांना संस्कारक्षम कथा सांगू शकतो एकदा सुरूवात केली की मुल जमायला लागतील. तसला संकल्प आपण वृध्द करूच शकतो .

3/4 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार झाल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. समाजाला या विकृतीच्या बाहेर काढायचं असेल तर सावित्रीबाई, जिजाऊ, झाशीची राणी, कल्पना चावला या आणि या सारख्या अनेक महिलांची महती सांगणा-या गोष्टी आपण सांगू शकतो जेणेकरून स्रीवर्गाबद्दल आदर निर्माण होईल असला संकल्प वृध्द निश्चित करू शकतात.

यापेक्षा मोठा संकल्प दुसरा कोणता असू शकतो का ?

संकल्प(sankalp), युवक / विद्यार्थी व वृध्दांसाठी
संकल्प(sankalp), युवक / विद्यार्थी व वृध्दांसाठी

 " मी प्रत्येक वादळ थोपवीन ,
अनुभव कसाला लावीन ,
   आत्मविश्वास मला आहे ,
    नवी पिढी सोनेरि घडवीन ,
              'साठी ' कसली अनुभव गाठी आहे."


Back To Top