![]() |
| पालकांनो आपल्या पाल्याच्या भविष्याचे आपणच आहात शिल्पकार |
पालकांच्या अपेक्षा आणी मुलांची प्रगती (parent expectation and child growth)
पालकांच्या अपेक्षा (parent expectation) फार असतात पण त्यांचा मुलांच्या प्रगतीवर (child growth) किती परिणाम होतो याचा कधी विचार केला आहे का? मित्रानो सध्या १० वि आणि १२ विच्या निकाल लागत आहेत, खरं तर निकाल हे परीक्षेचे असतात पण त्यामुळे निकाल लागतो तो विद्यार्थ्यांच्या संपूर्ण आयुष्याचा, असाच म्हणतात ना सगळे शिक्षक , नातेवाईक, शेजारी आणि आई वडीलसुद्धा, बरोबर का?. चला तर मग आज आपण जरा या फार महत्वाच्या विषयाची चिरफाड करूया.
मुलं १० वि आणि १२ विच्या वर्गात गेली म्हटल्यावर पालकांना वाटते आता वर्षभर आपल्यालाच अभ्यास करायचा आहे. अगदी आपल्या पाल्याने किती मार्क्स मिळवायचे हे सुद्धा वर्षाच्या सूरवातीलाच ठरवलं जात, ठरवलेल्या मार्कांना धरून स्वप्नरंजन सुद्धा सुरु केलेलं असतं. काहीं पालकांना तर १२ विचा वर्ग सुरु होताच मुलाच्या हॉस्पिटलची इमारतसुद्धा डोळ्यासमोर दिसू लागते. आईची तर फारच वाईट अवस्था होते, महत्वाचं वर्ष मुलांचं आणि मोबाईल, टीव्हीच काय पण सामाजिक कार्यक्रम, नातेवाईक सर्व सर्व बंद केलं जात. आईच दिवसभराचं एक शेड्युलच ठरवून दिल जात, का तर बाळाचं अभ्यासाचं वर्ष आहे. पण बघा काय आश्चर्य या सर्व प्रकारात मुलांच्या क्षमतेचा कुठेच विचार केलेला नसतो.
यात काही समजदार म्हटले जाणारे पालक ज्यांनी थोडेफार यूटुबवर विडिओ बघितले किंवा फारच झालं तर दोन चार करिअर कॉन्सिलिंगचे कार्यक्रम ऐकलेले किंवा बघितलेले आहेत, त्यांच्या भावना अर्थात भावनाविश्वच वेगळं असत. अशे पालक फार घाबरलेले दिसतात त्यांच्या प्रत्येक हालचालीत, बोलण्यातच काय पण प्रश्नांमध्ये सुद्धा काळजी, शंका आणि भीतीच जास्त जाणवते. एखादी व्यक्ती जेव्हा अशा पालकांशी संवाद साधते तेव्हा यांचे प्रत्येक शब्दापरत लक्ष आपल्या पाल्या कडे असते, त्यांच्या साठी तो म्हणेल तीच पूर्वदिशा असते. यांना करिअर कॉन्सिलिंग मध्ये सांगितलेलंच तस असत, किंबहुना घाबरावलेलंच असत. काय तर म्हणे मुलांच्या कलाकलाने घ्या, त्याच करिअर आहे त्याला निवडू दया. उद्या काही बरावाईट प्रसंग घडला तर त्याला कोण जबाबदार?
पालकांच्या अपेक्षा (Parent expectation)
मला सांगा,
पालकांनी एवढ्या आभाळभर, न पेलवणाऱ्या अपेक्षा ठेवणं योग्य आहे का?तसेच ज्या मुलांना आयुष्याचे कुठलेही अनुभव नाही त्यांनी करिअर निवडणे योग्य आहे का?
इंटरनेटवर मिळणारी माहिती म्हणजे कितपत खरंखुरं जग आहे ?
एकदा करिअर हातातून निसटलं तर पुन्हा संधी भेटणार आहे का?
आता तुम्ही म्हणाल पालकही चुकीचे मुलंही चुकीचे, मग योग्य ते काय ?
एखाद्या अभ्यासू व्यक्तीच मार्गदर्शन घेणे
करिअर कॉन्सिलिंगचे सेमिनार attain करणे.
मुलांची कलचाचणी करून घेणे.
विविध मार्गदर्शनपर पुस्तके वाचणे.
बाजारात अजूनही बरेच पर्याय उपलब्ध असू शकतात.
पण काय गम्मत आहे बघा आपल्या मुलांच्या करियरसाठी आपण स्वतः काहीच नाही करणार. जे काही अपेक्षित आहे ते सर्व आपल्याला आयतच भेटायला पाहिजे. कॉन्सिलिंगचे सेमिनार, कलचाचणी, मार्गदर्शनपर पुस्तके या सुविधा पुरवणाऱ्या व्यक्तींची करिअर मात्र छान पैकी सेट झालीत. तशीच मार्गदर्शन करणारी व्यक्ती किती अभ्यासू आहे हे आपल्या अभ्यासा नुसार बदलत असते. आपल्या जवळच्या एखाद्या सुध्न्य समजल्या जाणाऱ्या व्यक्तीला जाऊन विचारतो, पुढे जाऊन काय करायचं Engineering, BSc, Bcom, BA का Pharmacy ला ऍडमिशन घ्यायची. त्या आधी आपण विचार करत नाही कि सदर व्यक्तीचा त्या क्षेत्राशी काही संबंध आहे किंवा नाही. साधारण अश्या वक्ती कोठूनतरी ऐकलेली माहितीच आपल्याला सांगत असते, ती माहिती खरी का खोटी हे त्यांनी स्वतःही तपासलेले नसतं.
डोक्याला हात नका मारू बाबानो,
हे सर्व सत्यच आहे, तुम्हालाही माहितीच होत पण कधी तसा विचार केलाच नाही.
योग्य पद्धत काय आहे ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे किंवा एखादे स्किल आहे त्या क्षेत्रात करियर करणे. पण केवळ इंटरेस्ट असून चालत नाही कारण इंटरेस्ट हा काळ, वेळ आणि परिस्तिति नुसार बदलत असतात म्हणून इंटरेस्टच्या बेसवर करिअर निवडणे योग्य ठरणार नाही. यात योग्य मार्ग असा आहे, इंटरेस्ट आणि स्किल यांचा ताळमेळ साधून फिल्ड निवडावे. कदाचित म्हणूनच आपण आपल्या सभोवताली बघतांना हा प्रकार अनुभवतो, बरीचशी ग्रॅजुएटही न झालेली मंडळी त्यांच्या फिल्डमध्ये टॉपवर गेलेली आहेत.
नेहमी लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे, ज्या फिल्डमध्ये खूप स्पर्धा आहे अशा फिल्डमध्ये एक साधारण किंवा ऍव्हरेज व्यक्ती राहण्यापेक्षा कमी स्पर्धेच्या फिल्ड मध्ये टॉपवर राहणे कधीही योग्य . इथे स्पर्धा म्हणजेच आपण स्कोप असलेलं फिल्ड म्हणतो आणि कमी स्पर्धेच्या म्हणजे कमी स्कोप असलेलं फिल्ड.
म्हणूनच सांगावस वाटत करिअर कशात करायच हे शोधण्यात वेळ न घालवता जे काही वेळ, काळ आणि परिस्तिथिनुसार आपल्या समोर येईल त्यात प्राविण्य मिळवा. वयाची चार ते सहा वर्ष मेहनत करा, मगच राहिलेली पन्नास साठ वर्ष मजेत घालवू शकाल.
आणि हो सर्वात महत्वाचे, तुमचे १० वि किंवा १२ वीचे मार्क्स केवळ पुढील ऍडमिशनसाठीच महत्वाचे आहेत , पूर्ण आयुष्य त्यावर अवलंबून नाही म्हणूनच कमी मार्क्स मिळाले तरी हरून जाऊ नका. मागच सर्व विसरून परत जोमाने कामाला लागा'
ज्या पालकांचे मुलं अजून लहान आहेत त्याना एक महत्वाचा प्रश्न,करिअर (child growth) केव्हा पासून सुरु होत?
१) १० वी२) १२ वी
३) पदवी
४) पदवी नंतर
उत्तर:- वरीलपैकी एकही नाही
बस खरी चूक इथूनच होते, मुलांचं भवितव्य घडवायचं वय हे नक्कीच लहानपणाचं. पण पालकांना आठवण येते ती १० वि अथवा १२ वित.
आता बरेच म्हणतील आम्हीतर लहानपणापासूनच आमच्या मुलांकडे लक्ष्य देतोय. पण लक्ष द्यायचे म्हणजे काय करायचे.
![]() |
| करिअर केव्हा पासून सुरु होत? |
प्ले ग्रुप पासून मुलांना शिकवणी लावणे.
त्यांना हवं ते खेळणं घेऊन देणं .
भरपूर फी असलेली शाळा निवडणे.
महिन्यातून कुठेतरी फिरायला नेणे.
नाही हे निव्वळ स्वतःची जबाबदारी टाळणे आणि मुलांना खुश ठेवणे झाले.
बघा हं महत्वाचा विषय आहे,
ज्ञान प्रत्येक व्यक्ती मध्ये एक गुण असा असतो ज्यामध्ये ती व्यक्ती ९० ते १०० % निपुण असते, आपण जर आपल्या पाल्याच्या अशा विशेष गुणाचे आकलन करू शकलो तर सर्वच प्रश्न सुटतात. हो पण आपल्याला थोड्या अपेक्षा बदलवाव्या लागतील, असं म्हणून चालणार नाही कि माझा पाल्य इंजिनीअर किंवा डॉक्टरच झाला पाहिजे. आपण तारे जमीपर, ३ इडियट सारखे चित्रपट बघतो पण त्यातील विचित्रपणा लक्ष्यात ठेवतो आणि महत्वाचा असा मतितार्थ विसरून जातो.
एक उदाहरणं सांगावस वाटतं,
माझा मुलगा अडीच वर्षाचा होता तेव्हापासून मराठी वाचतो तेही न अडखडता. हे कस घडलं .
अगदी सोपं आहे, मला सकाळी पेपर वाचायची सवय आहे, तो दोन वर्षाचा होता तेव्हापासून पेपर वाचताना माझ्या मांडीत बसायचा, पेपर ओढायचा , पेपरवरील चित्र बघून नाही नाहीते प्रश्न विचारायचा , थोडक्यात भरपूर त्रास द्यायचा. पण मी कधीच राग न करता त्याच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तर द्यायचो, हळूहळू तो पेपरच्या लाइनवर बोट ठेवायला लागला माझं अनुकरण करून वाचायचं नाटक करायला लागला, अगदी त्याच वेळी मी त्याला मराठी अक्षरलिपी (बाराखडी) आणून दिल, त्यातून तो क ख ग शिकला , यात महत्वाची बाराखडी क का कि कु के ...... या प्रमाणे दिलेलं आहे, त्यामुळे त्याला मराठी वाचन अगदी सहज अवगत झाले
आपल्या पाल्याला एखाद्या पझल गेम मध्ये एखादा विशिष्ट आकाराचा ठोकला बसवतात तस का म्हणून बसवायचं. त्याला लहानपणा पासूनच असा तयार करा जेणेकरून तो कुठल्याही क्षेत्रात गेला तरी त्याची कामगिरी उत्तमच राहील.
![]() |
parent expectation and child growth |
आता हे कस करणार, तर बघा अगदी सोपं आहे .
त्याला स्वतः अभ्यासाची सवय लावा
त्यासाठी सतत अभ्यास कर असे मागे न लागता खेळाखेळात अभ्यासाची गोळी लावा, स्वतः आई आणि वडिलांनी कमीतकमी एक एक तास तरी अभ्यासासाठी घेऊन बसावे. ज्या आई आणि वडिलांना वेळ भेटत नसेल त्यांनी भरपूर पैसे कमवावे मात्र मुलांच्या भविष्याचा विचार करू नये.
त्याच्याशी आपली वागणूक सभयपणाची असू द्या
आपला सामाजिक, कैटुंबिक, संताप त्याच्या समोर प्रगट करू नये. इतरां बाबतीत वाईट बोलणं टाळावंतो चिडचिड ,संताप करणार नाही या कडे लक्ष असु द्या
एखाद्या हट्टासाठी मुलांना मारण कधीच योग्य नाही, मुलं हट्ट करतात तेव्हा आपण अडून बसणं संतपण हात उगारण योग्य होऊच शकत नाही. तसेच करायचे तर मग त्यांच्यात आणि समजदार पालकांमध्ये काय फरक राहणार. अगदीच झालं तर शांततेनं समजावणे कधीही योग्यच ठरते, प्रयोग करून बघा, मुलं ऐकतात आणि हट्ट सोडतात असाच प्रत्यय येईल. उद्या घेऊ, आज पैसे नाही, यापेक्षा छान घेऊ असं सांगू शकतात.
त्याला सतत प्रोत्साहन देत रहा
अगदी लहानपाणी पासून त्याच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष द्या, खेळतांना तोच जिंकेल असं काही करा, अभ्यासात तो हुशार आहे याची जाणीव करून द्या. विशेष म्हणजे आपला पाल्य यापेक्षा छान करू शकतो हे त्याला वारंवार सांगा.
त्याचे व्यवहारी ज्ञान वाढावा
बाजारात जाताना त्याला सोबत घ्या, किराणा घेतल्यावर बिल करताना त्याला सोबत ठेवा. आपण कितीही श्रीमंत असलात तरी त्याला पैशाची किम्मत समजू द्या. मुलांच्या समोर तुम्ही भरपूर कमावतात हा विषय कधीच करू नका.
वरील सर्व बाबींचा विचार प्रत्येक पालकाने तसेच विद्यार्थाने करावा, खर तर पालकांनो आपल्या पाल्याच्या भविष्याचे आपणच आहात शिल्पकार. पालकांच्या अपेक्षा (parent expectation) अवाजवी असतात असंही म्हणणं योग्य होणार नाही. परंतु मुलांकडून प्रगतीची (child growth) अपेक्षा ठेवतांना आपली भूमिका प्रत्येक पालकाने लक्ष्यात घ्यायला हवी. आपल्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.



