Khandeshi baiganka bharta recipe (वांग्याचे भरीत )
साधारण ४ व्यक्ती साठी
- मोठे वांगे १ किलो
- ८ - १० हिरव्या मिरच्या बारीक
- २ - ३ हिरव्या मिरच्या जाड
- ५ - ८ लसुण पाकळ्या
- १ वाटी कांद्याची पात
- १ वाटी चिरलेली कोथींबीर
- १२ - १५ कच्चे शेंगदाणे
- कढीपत्ता
- सुक्या खोब~याचे ५ - ६ काप
- मीठ
- तेल
| Khandeshi baiganka bharta recipe |
वांग्याचे भरीत बनवायची कृती -
सर्वप्रथम वांग्याला तेलाचा हात फिरवून घ्या . वांगे भाजण्यासाठी गॅसवर ठेवा, शहरामध्ये सरपण किंवा काटे भेटत नाही म्हणून गॅसवर पूर्ण भाजून घ्या.
![]() |
| Khandeshi baiganka bharta recipe |
त्यानंतर तव्यावर जाड व बारीक मिरची भाजून घ्या. भाजलेल्या मिरच्या छोट्या छोट्या कापून घ्या.
आता बडगी मध्ये जाड व बारीक मिरची, लसुण पाकळ्या, कांद्याची पात, चिरलेली कोथींबीर आणि मीठ ठेचून घ्या.
सर्व एकजीव झाल्यावर त्यात भाजलेल्या वांग्याची साल काढून एक एक वांग टाकून ठेचून घ्या.
| Khandeshi baiganka bharta recipe |
आता कढईमधे तेल तापवून त्यात लसूण तुकडे घाला नंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंगाची फोडणी द्यावी.
त्यात शेंगदाणे आणि खोबरे घालुन परतावे. खोबरे सोनेरी रंगावर भाजले गेले की त्यात कापलेली कांद्याची पात टाकावी.
आता जाड हिरव्या मिरच्या तुकडे करून टाकाव्या.
(चवदार लागावी म्हणून मिरची उभी चिरून आतून थोडे मीठ लावून घ्यावे.)
त्यावर बडगीमध्ये ठेचलेले सर्व मटेरियल टाकावे, मीठ टाकुन व्यवस्थीत परतुन घ्यावे. १ वाफ आल्यानंतर कोथींबीर घालुन २-३ मिनीटे परतुन घ्यावे.
अजून बघा खान्देशची चटपटीत डाळ गंडोरी बनवायची पद्धत 

